
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी लिमगाव ता जि नांदेड येथे जी नेक्स्ट ऑरगॅनिक सेल्स अँड सर्विसेस नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय सेंद्रिय शेती प्रमाणीकरण व वीपण चर्चासत्र शिबीर संपन्न या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री डॉ एस डी मोरे संचालक कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी विशेष उपस्थिती श्री सचिन पालकर सॅप ॲग्रो मुंबई श्री विजय म्हात्रे सेंद्रिय शेती सल्लागार औरंगाबाद प्रमुख पाहुणे श्री रविशंकर डी चलवदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड विनीत डॉ देवीकांत देशमुख डोंगरगावकर वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख सर्व शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र पोखरणी हर्षल जैन ऑल इंडिया सेंद्रिय प्रमाणीकरण अधिकारी रविशंकर डी सरवदे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना सर्व शेती सेंद्रिय करणे शक्य नसेल तर 20 टक्के ते 30 टक्के शेती सेंद्रिय करा केमिकल मुक्त आणखा व निरोगी रहा असे आव्हान त्यांनी शेतकऱ्यांना केले.
टप्प्याटप्प्याने रसायन व केमिकल कमी करा या कार्यक्रमामध्ये सायाळचे प्रगतिशील शेतकरी रत्नाकर पाटील ढगे यांना सेंद्रिय शेतीचे प्रसारक व युवा अनुभवी शेतकरी म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ देवीकांत देशमुख व हर्षल जैन यांनी शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले या कार्यक्रमाला नांदेड परभणी हिंगोली लातूर या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय शेती करणारे शेतकरी उपस्थित होते.