
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- बॉलीवूडमध्ये आपल्या परखड वक्तव्यामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्य़ात सापडणारे सेलिब्रेटी म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे नाव घेता येईल. ते राजकीय, सामाजिक विषयांवर देखील बिनधास्तपणे प्रतिक्रिया देताना दिसुन आले आहे. आता पुन्हा एकदा ते चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांनी बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
ती चर्चेत आली आहे. ते म्हणतात, सुशांतची आत्महत्या आणि त्याचा तपास याबाबतील सत्य अद्यापही आपल्यासमोर आलेले नाही. त्यामुळे आपण जे ऐकतो आणि वाचतो आहोत त्याचा आणखी गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर यापूर्वी देखील राम गोपाल वर्मा यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.