
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :- शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेनं ‘साम टीव्ही’वर खळबळजनक खुलासा केल्यानंतर आता पुणे पोलिसांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. कुचिक प्रकरणातील पिडीतेचा जबाब पुन्हा नोंदवणार तसंच नव्या दाव्यांच्या अनुषंगाने तपास करणार असल्याचं पुण्यातील डीसीपी प्रियांका नारनवरे सांगितलं आहे.
कुचिक यांच्या विरोधात विशिष्ट पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी चित्रा वाघ यांनी आपणाला भाग पाडलं असल्याचा आरोप या पीडितेनं केल्यानंतर या प्रकरणाला वेगळ वळणं लागलं आहे. तसचं या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी जातीनं लक्ष घातलं आहे. आपण त्या पीडितेला भेटणार असून भेटल्यानंतर सर्व कारवाई करु असं चाकणकर म्हणाल्या आहेत.