
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त कै.शिवराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, तोटेवाड फिजिकल अकॅडमी नविन मोंढा,नांदेड च्या वतीने 1600 मीटर धावण्याची शारीरिक चाचणी परीक्षा दिनांक:13 एप्रिल 2022 रोजी सायन्स कॉलेज मैदान श्रीनगर, नांदेड येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये पोलीस भरती व आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या नांदेड मधील वेगवेगळ्या फिजिकल अकॅडमीनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
यात सोल्जर अकॅडमी, दिशा करिअर अकॅडमी, जय हिंद अकॅडमी, एस.पी अकॅडमी, मिशन ऑफिसर्स अकॅडमी, तिरंगा अकॅडमी, नांदेड अकॅडमी, न्यू फिजिकल अकॅडमी या नांदेड मधील सर्व फिजिकल अकॅडमींनी सहभाग घेतला. या संपूर्ण स्पर्धेतून सर्वोत्तम वेळ नोंदविणाऱ्या प्रथम पाच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्यात प्रथम सावंत सखाराम, द्वितीय दणदने सूर्यकांत, तृतीय चव्हाण विश्वर, चतुर्थ हनुमंते जाधव आणि पाचवा क्रमांक श्रीकांत कौठकर या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवले.
ही संपूर्ण स्पर्धा पार पडण्यासाठी गणेश दणदने सर, अरविंद राठोड सर, सतीश पारधे सर, वाघमारे सर, कारले सर, करीम सर, अर्जुन सर इत्यादी फिजिकल चे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सहभाग लाभला.