
दैनिक चालु वार्ता
नवनाथ डिगोळे
चाकुर प्रतिनिधी
चाकूर :- आज चाकूर तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून ८ लाभार्थ्यांना आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आला. कुटुंबातील १८ ते ५९ वयातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास त्यांच्या वारसांना या योजनेतून २० हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात देते. यामध्ये दाडगे अंजली विलास, सूर्यवंशी कमलबाई संतोष, माने रमाबाई श्रीमंत, सूर्यवंशी छाया नंदकुमार, काळे सुनिता माणिक, जाभाडे प्रेमलाबाई बळीराम, सुरनर शिलाबाई किशन, जाधव रेखा किशन या लाभार्थ्यांचा सामावेश आहे.
प्रसंगी तहसीलदार शिवानंद बिडवेजी, माजी सभापती तथा संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष करीमसाहेब गुळवे, अध्यक्ष काँग्रेस विलासराव पाटील चाकुरकर , राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, संदीप शेटे, पांडुरंग धडे, मदन रामसाने आदी उपस्थित होते.