दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी येथील आकाश विहार येथे सम्राट अशोक,महात्मा फुले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्मयोगी फाऊंडेशनच्या माध्यमातुन सामाजिक जाण असलेले ललित ढेपे यांचे संकल्पकतेतून समाजसेवक व माजी सैनिक निरंजनभाऊ वानखडे यांच्या सौजन्याने अपंग बांधवाला केली तीन चाकी सायकल भेट दिली.
कर्मयोगी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात.”कर्म हिच पुजा” या ब्रिद वाक्याप्रमाणे ऋणानुबंध उपवर युवक युवती मेळावा असो की,निराधार लोकांना मदत असो,की शैक्षणिक मदत असो ते गाडगे बाबा यांच्या दससुत्री कार्यक्रमानुसार भुकेल्याला अन्न,ताहनलेला पाणी या वृत्तीप्रमाणे,कर्मयोगी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन कार्य निरंतर सुरू आहे.
निरंजन वानखडे माजी सैनिक यांनी सामाजिक जान ठेवुन कर्मयोगी फाऊंडेशनच्या माध्यमातुन टवलार येथील अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणारे अपंग बांधव गोपाल रामकृष्ण ठाकरे यांना सायकल भेट देवुन सामाजिक ऋण फेडले आहे.अपंग व्यक्ती गोपाल ठाकरे हे मूळचे टवलार ता.अचलपूर येथील असून यांची परिस्थिती अत्यंत हालकीची असल्याने एका अपंग व्यक्तीचे अश्रू पुसण्याचे काम कर्मयोगी फाऊंडेशनच्या मार्फत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन कर्मयोगी फाऊंडेशन सामाजिक संस्थे तर्फे केले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य मनोहरदादा रेचे,तर प्रमुख अतिथी म्हणुन जेष्ठ विचारवंत विजयराव रायबोले, नितिन वानखडे,सायकल दाते माजी सैनिक निरंजन वानखडे,युवा पत्रकार मनोज मेळे,रामहरी खोकले,प्रल्हादराव ढेपे,मदन राऊत, अमोल हाडोळे,जेष्ठ पत्रकार गजानन चांदुरकर,रामेश्वर चाटघोडे, सौ.सविता प्रविण पेटकर,सौ.राजश्री वानखडे,सौ.राधाताई ढेपे प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविणभाऊ पेटकर यांनी केले तर प्रास्ताविक व आभार कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ललीत ढेपे यांनी केले.