
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- लोहा भाजप तालुकाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांची कंधार तालुक्यातील घोडज येथे वाढदिवसाचे अवचित्ते साधून ऋषी महाराज यात्रा कमिटीच्या वतीने साखर तुला करण्यात आली. कंधार तालुक्यातील घोडज येथे लोहा भाजपचे तालुकाध्यक्ष तथा मा. उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांची घोडज येथे ऋषी महाराज यांच्या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने शरद पाटील पवार यांना ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढून साखर तुला करण्यात आली. या याञेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे रेड्यांची टक्कर पाहण्यासाठी आकर्षक असते या रेड्याच्या टकरीचे उद्घाटन उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित सरपंच तथा कृ. उ. बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, उपसरपंच आत्माराम पा. लाडेकर, माजी सरपंच नागोराव पा. लाडेकर, उधव पा. लाडेकर , पोलीस पाटील भीमराव लाडेकर , संभाजी पा. लाडेकर ,केशव पा. लाडेकर ,प्रभाकर पा . जाधव नगरीचे युवा उद्योजक सुलतान अण्णा बेग, जिवन पा.लाडेकर अनिल पा.लाडेकर, भाऊसाहेब पा.लाडेकर, शिवहार पा. शिंदे, सचिन पा.पवार यांच्यासह गावकरी व यात्रेकरू उपस्थित होते.