
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मुखेड
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- कर्णा येथे १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम त्यात सकाळी ठीक ९ वा सरपंच केराबाई गोविंद गवळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण होईल तसेच दुपारी ३ वा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरणुक गावातील प्रमुख रस्त्याने निघेल
व सकाळी ठीक ११ वा संघर्षाताई जयवंत सोनावणे यांच्या कडून भोजनदान तसेच रात्री ठीक ८ वाजता भिमशाहीर साहेबराव येरेकर आणि त्यांचा संच यांचा दणदणीत भिमगिताचा कार्यक्रम होणार आहे. तरी हजारोच्या संख्येने हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान जयंती मंडळ समितीने केले आहे.