दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- राज्य सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे शासन परिपत्रकान्वये अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून वाटप केलेली मदतीची रक्कम खातेदारांच्या खात्यावर जमा करताना. मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसूली न करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, व्यापारी, ग्रामीण तसेच सहकारी बँकांनी परिपत्रकात दिलेल्या सुचनेनुसार शासनाकडून पिकांच्या नुकसान भरपाईसाठी वाटप केलेल्या रक्कमेसंबधित खातेदारांच्या बॅक खात्यावर जमा करताना मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही प्रकारची वसूली करू नये तसेच शासन परिपत्रकाची अंमलबजावणी कटाक्षाने करावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.