
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून कळते आहे. सरकार सुप्रीम कोर्टात याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी नुकताच आदेश देताना राज्य सरकारला परमबीर सिंह यांच्या विरोधातील सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. पण सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारला रुचलेला नाही.
परमबीर सिंह प्रकरणातील काही गुन्हे हे सीबीआयकडे दाखल केले जाऊ शकत नाहीत, असं सांगत सरकार सुप्रीम कोर्टाला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करणार आहे. दरम्यान, यासाठी पुढच्या आठवड्याभरात महाविकास आघाडी सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.