
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
सातारा :- मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काल उत्तर सभा ठाण्यात पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सभेला सुरवात करताना सुरवातीलाच राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष केलं आहे. तसेच त्यांच्यावर अनेक मुद्द्यांवरून टीका केली आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले कि, शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना कोणत्याही सभेत दिसणार नाहीत, कारण छत्रपतींचे नाव घेतलं की मुस्लिम मते मिळणार नाहीत. त्याचबरोबर शरद पवार हे जातीवादीय आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी पवारांवर चांगलाच निशाणा साधला आहे.मात्र यावर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रत्त्युत्तर देत राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.
शरद पवार हे जातीयवादी नाहीत, त्यामुळे राज ठाकरेंनी केलेलं भाष्य हे खोटं आहे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. यावेळी आठवले साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच काल मनसेने प्रखरपणे हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. मात्र यावरून देखील आठवले यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.’भाजपचा मनसेला सोबत घेण्याचा निर्णय योग्य होणार नाही. आम्ही भाजपसोबत असल्याने त्यांनी मनसेला सोबत घेऊ नये. आरपीआय बरोबर असताना भाजपला मनसेची काय गरज,’ असे आठवले म्हणाले.