
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- बॉलिवूडचे लव्हबर्ड आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नानंतर चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती आलीया-रणबीर लग्नाची. तसंच त्यांचं लग्न कोणत्या तारखेला होणार, लग्नाला कोणत्या दिग्गज अभिनेत्यांची उपस्थिती असणार आहे, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. अनेक महिन्यांपासून डेट करत असलेले आलिया आणि रणबीर अखेर लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याने चाहत्यांसह त्यांच्या नातेवाईकांकडून लग्नासाठी शुभेच्छांचा वर्षाव होतोय. प्री-वेडिंग फंक्शनलाही सुरुवात झाली आहे.
– आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मेहंदी
आलिया-रणबीरचा मेहंदीचा सोहळा थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी कपूर कुटुंबीयांची उपस्थिती लक्षणीय होती. बॉलिवूडचा दिग्गज निर्माता करण जोहर आणि अयान मुखर्जी यांची विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे अयानचे रणबीर आणि आलिया यांच्या कुटुंबीयांशी जवळचे स्नेहसंबंध आहेत. आलियाच्या हातावर मेहंदी लावल्यानंतर करण जोहर भावूक झाल्याचं एका व्हिडिओमध्ये समोर आलं आहे. करिना कपून खान आणि करिष्मा कपूर या सोहळ्याला उपस्थित होत्या. करण जोहर यांनी आलियाला मेहंदी लावल्यावर त्याला अश्रू अनावर झाले.
– लग्नाआधी कुलदैवतांची पूजा
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या कुटुंबीयांनी लग्नापूर्वी एक पूजा ठेवली आहे. ही पूजा कुलदैवतांची आहे. चेम्बूरच्या राजकपूर बंगल्यात कुलदैवतांची पूजा १४ एप्रिलला गुरुवारी ठेवण्यात आलीय. लग्नासाठी ठेवण्यात आलेल्या पुजेसाठी दोन्ही कुटुंबाकडून जय्यत तयारी सुरु आहे.
– पंजाबी विधीनुसार होणार लग्न
लग्नाआधी कुलदैवतांची पूजा होणार असून पंजाबी गुरुग्रन्थ साहेबांचं पठणही केलं जाणार आहे. लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी आलिया-रणबीर पजांबी विधीनुसार कुलदैवतांची पूजा करणार आहेत.