
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या तोंडावर चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्रसिंह धोनीने कॅप्टन्सी सोडली. त्यामुळे रवींद्र जाडेजाला चेन्नईच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.
आता 15 वा मोसम ऐन रंगात असताना रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी सोडणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. रोहित विराट कोहलीप्रमाणे रोहित कॅप्टन्सी सोडू शकतो, असं टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर म्हणाला आहे.
इतकंच नाही, तर संजय मांजरेकरने मुंबईचा पुढील कॅप्टनचंही नाव सुचवलं. मांजरेकरनुसार कायरन पोलार्ड नेतृत्वाची जबाबदारी सांभाळू शकतो. मांजरेकर काय म्हणाला? “मला वाटतं पोलार्डचं टीममध्ये मोठं योगदान असतं. मला असंही वाटतं की रोहित विराटप्रमाणे कॅप्टन्सी सोडू शकतो. यामुळे रोहितवर असलेला दबाव कमी होऊ शकतो. यामुळे रोहितला फलंदाज म्हणून खेळू शकतो. तसेच नेतृत्वाची जबाबदारी पोलार्डला मिळायला हवी, कारण तो चांगला आंतरराष्ट्रीय कॅप्टनही आहे”, असं मांजरेकरने नमूद केलं.
तो इएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलत होता. रोहितला गेल्या 3-4 मोसमांपासून अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश येत आहे. रोहितने या दरम्यान 30 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. “रोहित टीम इंडियाकडून चांगला खेळतो. कारण तो तेव्हा संघासाठी कमी आणि स्वत:बाबत जास्त विचार करतो”, असंही मांजरकेरने नमूद केलं.