
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
जालना :- वीज गळती आणि थकबाकी जास्त असलेल्या भागात महावितरणने विजेचे भारनियमन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या क्षमतेनुसार कमी जास्त प्रमाणात हा पुरवठा दिला जात आहे. याची अधिकृतरीत्या घोषणाही बाकी आहे. मात्र, जे फीडर किंवा परिसर हा ई ते एफ म्हणजेच वीज गळती आणि थकबाकी जास्तमध्ये आहे. या परिसरातील नागरिकांना भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. भारनियमनाची वेळ अद्यापही निश्चित नसल्याने क्षमतेपेक्षा अधिक विजेची मागणी झाल्यास समान वाटप होईपर्यंत हे भारनियमन आहे.
सध्या जालना शहरात ‘जी’ वर्गातील ५ तर ई आणि एफ गटातील ५ अशा दहा फीडरवर विजेचे अपडाऊन सुरू आहे. मंगळवारी रेल्वेस्टेशन, मंगळबाजार या फीडरला दुपारी ३:३० ते ७ असे साडेतीन तासांचे भारनियमन करण्यात आले. जालना जिल्ह्यासह शहरात भारनियमानासाठी महावितरणने ‘ए’ ते ‘जी’पर्यंत गट केले आहेत. विजेची गळती आणि थकबाकी किती आहे यावरून तो परिसर या वेगवेगळ्या गटात मोडला जातो. सध्या जालना शहरात ई ते जी गटात काही वाहिन्या आहेत. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ई ते जीच्या आत १० वाहिन्या (फीडर) आले आहेत.
या ठिकाणी सध्या भारनियमनाचे नियोजन करण्यासाठी पर्याय सुचवला जात आहे. किती तासांचे भारनियमन करायचे याचा अधिकार हा सध्या तरी स्थानिकांना देण्यात आला नाही. मात्र, दररोज वरिष्ठ पातळीवर ऐनवेळी आदेश येतो आणि त्यांच्या सूचनेनुसार संबंधित वाहिनीचा विद्युत पुरवठा विजेचा वाढता दाब कमी करण्यापर्यंत बंद केला जातो. एक तास असाे किंवा दोन तास नंतर दुसरा आदेश आला की पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत केला जातो. शेती पंपाचा विद्युत पुरवठा दिवसा आठ तास व रात्री दहा तास होता. नव्या नियमानुसार रात्री दहा तासांऐवजी आठ तासांवर करण्यात आला आहे.
सध्या शेतीचाही लोड कमी असल्याने शेतीपंपाचा पुरवठाही कमी जास्त केल्यास फारशी ओरड शेतकऱ्यांतून होत नाहीये. दरम्यान, ग्रामीण भागात भारनियमनाचा एवढा फटका बसताना दिसून येत नाहीये. मात्र, जालना शहरात याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. जालना शहरात ५५ हजार ग्राहक आहेत. ई ते जी या दोन गटांत मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. तर १० फीडर येतात. यावर ऐनवेळच्या नियोजनानुसार महावितरणकडून भारनियमन केले जात आहे. याबाबत अधिकृतरीत्या भारनियमन जाहीर करण्यात आलेले नसल्याने आमच्या परिसरातील लाइट का गेली याबाबत चर्चा, चौकशी करण्यासाठी महावितरणकडे दिवसाला शेकडो कॉल येत आहे.
अधिकृतरीत्या भारनियमन जाहीर केले नसल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही नाहकची कारणे द्यावी लागत असल्याची परिस्थिती जालना शहर भागातील कार्यालयात मंगळवारी पाहायला मिळाली.
जास्तीत जास्त साडेतीन तास भारनियमन जालना शहर हद्दीतील महावितरणच्या अधिकाऱ्यांना भारनियमनाची स्थिती अद्यापही जाहीर करता येत नाही. ऐनवेळी सूचना प्राप्त होत असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार सुरुवातीला एक तास त्यानंतर वाढ झाल्यास दोन तासांचा कालावधी सांगितला जात आहे. त्यापुढेही लोड वाढलेला असल्यास साडेतीन तास काही ठिकाणचा वीजपुरवठा बंद केला जात आहे.
याबाबत अधिकृतरीत्या जाहीर करण्यासारखे भारनियमनाचा निर्णय झाला नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तोडगा निघाल्यानंतर होणार नागरिकांची सुटका महावितरणकडून भारनियमानासाठी महावितरणने ‘ए’ ते ‘जी’पर्यंत गट केले आहेत. विजेची गळती आणि थकबाकी किती आहे यावरून तो परिसर या वेगवेगळ्या गटात मोडला जातो. ई ते जी अशा गटात सध्या भारनियमन केले जात आहे. हे ऐनवेळी आलेल्या नियोजनानुसार स्थानिकला ठरवले जाते. सध्या विजेचा तुटवडा असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. यावर तोडगा निघाल्यास नागरिकांची यापासून सुटका होईल.
शिवाय पर्याय न झाल्यास यामध्ये वाढही होणार आहे. मंगळवारी साडेतीन तासांचे भारनियमन रेल्वेस्टेशन, मंगळबाजार फीडरला साडेतीन तासांचे भारनियमन करण्यात आले. जालना शहरातील मोतीबाग परिसरातील गोकुळनगरी फीडरवरील लोड रेल्वेस्थानक फीडरला जोडल्यानंतर जी गटातील रहिवाशांना पुन्हा विजेच्या अपडाऊनचा सामना करावा लागला. शहर हद्दीतील ई ते जी गटातील कोणत्याही फीडरवर ही स्थिती निर्माण होणार आहे. यामुळे विजेचा वापर जपून करावा, वीज बिले वेळेत भरावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.