दैनिक चालु वार्ता
लोहारा प्रतिनिधी
महेश गोरे
लोहारा :- लोहारा पोलीस स्टेशन येथे नितीन दिनकर शिंदे यांच्यावर दाखल करण्यात आलेला 354 कलम अंतर्गत नोंदवण्यात आलेला गुन्हा हा खोटा आसून तो रद्द करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी यासाठी फकीरा ब्रिगेड यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत लोहारा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की मौजे नागुर येथील रहिवासी नितीन दिनकर शिंदे व फिर्यादी हे आपापसातील नातेवाईक असून यांचा वाढदिवसाच्या कारणावरून आपापसात भांडण हानामारी झाली होती.
यामध्ये नितीन दिनकर शिंदे यांना षडयंञ करून व फसवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आसुन न केलेल्या गुन्ह्यासाठी गेल्या चौदा दिवसापासून सदरचा युवक उस्मानाबाद येथील कारागृहात गुन्ह्याचे शिक्षा भोगत आहे. तरी याबाबत वरिष्ठ कार्यालयाने चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे . तसेच लोहारा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले जाधव व शेवाळे यांच्यावर करण्यात आलेले आरोप देखील खोटे असून याची ही चौकशी करण्यात यावी.
यासाठी फकीरा ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी फकीरा ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष श्रीरंग सरवदे यांनी तसेच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर दत्ता पाटोळे फकीरा ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्रीराम सरवदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.