दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी वर सडकून टीका केली. यानंतर मनसे-भाजप युती बाबत चर्चेला उधाण आले होते. जयंतीनिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आज पुणे स्टेशन येथे आले होते. अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर, पत्रकारांनी मनसे सोबत भाजपाची युती होईल का ? असा प्रश्न दादांना विचारला.
त्यावर असा कोणताही प्रस्ताव अद्याप पर्यंत आला नाही. तसा प्रस्ताव आल्यानंतर आमची तेरा जणांची कोर कमिटी आहे, तेथे प्रथम चर्चा होते. मात्र आम्ही निर्णय घेवू शकत नाही. केंद्रीय नेतृत्वाला तसा प्रस्ताव पाठवू शकतो. अंतिम निर्णय तेच घेतील, अशी थेट भूमिका चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली.