
दैनिक चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी
प्रा अंगद कांबळे
म्हसळा :- म्हसळा तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब यांच्या जयंती निमित्ताने मेंदडी येथील रा. जि. प शाळा मेंदडी चे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक किशोर मोहिते,सर बालअध्यक्ष नमिता कोळी,गीतांजली भाटकर,सायली बीर्जे, मयुरी पाटील, प्रियंका गोसावी, शबाना जलगावकर, अमिना बंदरकर सुरुवातीला शाळेतील इयत्ता ७ वी तील विद्यार्थीनी कु प्रणाली गणेश पाटील हीचे अल्पशा आजाराने निधन झाले यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या जीवनावर आधारित बालपण, शिक्षण, त्यांचे देशासाठी असलेले योगदान यावर माहिती देण्यात आली. तद्नंतर शासन आदेशानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.वारळ रा जि प शाळा येथे हि महामानवाच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून कार्यक्रम घेण्यात आले.
या वेळी श्री दगडूसाहेब शिंदे, प्रवीण सोनावणे, विद्यार्थी उपस्थित होते रोहिणी रा जि प शाळा येथे भानुदास राठोड, शिवाजी चव्हाण यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जयंती साजरी केली गोंडघर उर्दू शाळा येथे नदीमोदींन सय्यद यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आला या विद्यार्थी उपस्थित होते काळसूरी रा जि. प शाळा येथे विपुल चकरवार, लक्ष्मण चिकाटी यांनी जयंती साजरी केली रा जि प शाळा रेवली येथे केंद्रप्रमुख श्री अ. बा मोरे व त्यांचे सहकारी शिक्षक, विद्यार्थी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जयंती साजरी केली.
रा जि प शाळा बनोटी येथे हि श्रीमती सावंत मॅडम यांच्या उपस्थित जयंती साजरी करण्यात आली साळवींडे, रा जि प येथीही श्री अकोलकर सर यांच्या उपस्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले रा जि प शाळा आगरवाडा येथे ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.