
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगला आहे. राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळावा आणि उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवारांवर थेट जातीयवादाचे आरोप केले. इतकेच नाही तर शरद पवार हे नास्तिक असून ते मुस्लीम मते जातील म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत असा आरोप केला होता. त्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. आता या वादात भाजपानेही उडी घेतली आहे.
भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना चौफेर हल्लाबोल केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनी फडणवीसांनी पवारांना आंबेडकरी विचारांना बाजूला करत राष्ट्रवादी काँग्रेसचा जातीयवादी राजकारणाचा इतिहास आहे असं म्हटलं आहे. बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देत फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३७० ला कडाडून विरोध होता, एका बाजुला आपण थाटामाटात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करतोय पण दुसऱ्या बाजुला त्यांच्या विचारांना बाजुला करतो.
बाबासाहेब आंबेडकरांचा आर्टिकल ३७० ला विरोध होता. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देण्यास त्यांचा विरोध होता. पण पवारांच यावर मत काय हे सर्वांनाच माहिती आहे. पवारांचे याबद्दलचे वेगवेगळे वक्तव्य आलं तरी कसलही आश्चर्य नाही. त्यांच्या पक्षाचा संपूर्ण इतिहास पाहिला तर अशाच पद्धतीने जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड आहे असं स्मरण करून राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.