
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
जव्हार :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त प्रमुख पाहुणे आलेल्या विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी ग्रामीण भागातील युवक संदीप साळवे यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमात विशेष योग्यतेने ९५.५० टक्के गुण मिळवल्याने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. जव्हार मध्ये पहिल्यांदाच के.व्ही. हायस्कुल शाळेत शालांत प्रमाणपत्र परीक्षेत काशिनाथ साळवे यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत ७० टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते, त्याची पुनरावृत्ती त्यांचा पुतण्या संदीप साळवे ने केली असल्याचे मत प्रा.डॉ.हेमंत मुकणे यांनी बोलताना सांगितले,जव्हारच्या वैभवात भर टाकल्याचे भावनिक उदगार देखील नागरिकांनी काढले.
संपूर्ण तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,शिवाय आमदार भुसारा यांनी माझ्या मतदार संघातील युवा पत्रकाराने संपादन केलेले यश विशेष बाब असून या भागातील मुलांमध्ये योग्यता आहे, शिक्षणातून या भागातील युवक युवती आपला व समाजाचा विकास साधायला सुरुवात केली आहे.आंबेडकर स्मारक येथे,बाबांच्या जयंती दिनी माझ्या परिवारासमोर, माझ्या समाजा समोर,आमदार भुसारा यांनी माझा सत्कार करणे, माझ्यासाठी भाग्याची बाब असल्याचे पत्रकार संदीप साळवे यांनी बोलताना सांगितले.