
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा शहर व तालुक्यासहित संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा खरेदी करण्याचा ठराव लोहा न.पा. च्या सभागृहात सर्वानुमते मंजूर झाला आहे अशी माहिती लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी दिली.
लोहा न.पा. च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम चालू आहे यात चबुतऱ्याचे काम प्रगतीपथावर आहे.
तसेच येथे लवकरच जवळपास 70 लक्ष रुपयांचा अश्वारूढ पुतळा लोहा न.पा. च्या फंडातून बसविण्यात यावा यासाठी लोहा न.पा.ची एक विशेष सभा नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दि.12-4-2022 रोजी संपन्न झाली व यात नगर परिषद निधीतून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकरीता खरेदीची निविदा काढण्याचा ठराव मंजूर झाला व ठरावाचे सुचक नगरसेवक संदीप दमकोडवार होते तर त्यांना अनुमोदन नगरसेविका राहिबाई खिल्लारे यांनी दिले व हा ठराव न.पा. सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नगरसेवक केशवराव मुकदम, नगरसेवक शरद पवार, नगरसेवक छत्रपती दादा धुतमल नगरसेविका सौ.शारदाबाई बबनराव निर्मले, नगरसेविका सौ. वर्षाताई संभाजी पाटील चव्हाण, नगरसेविका ज्योती जिवन चव्हाण नगरसेविका गोदावरीताई गजानन सुर्यवंशी नगरसेविका नयातबी हबीबसाब शेख, नगरसेविका आनुसंयाबाई येलरवाड नगरसेविका राहीबाई खीलारे नगरसेवक करीम शेख, नगरसेवक पंचशील कांबळे नगरसेवक दत्ता वाले नगरसेवक भास्कर पवार नगरसेवक अमोल व्यवहारे, आदी उपस्थित होते.
तसेच हा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व सर्व नगरसेवकांनी लोहा न. पा. च्या बाहेर फटक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.