दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- बीआरटी मार्गात होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ‘बुम बॅरिअर’ची (स्वयंचलित फाटक) चाचणी नुकतीच यशस्वी झाली आहे. परदेशात अशा उपाय योजनेचा नेहमी वापर केला जातो. त्यामुळे आता बीआरटी मार्गांमध्ये होणार्या खासगी वाहनांच्या घुसखोरीला आळा बसणार आहे. तसेच, ही यंत्रणा पुणे शहरातील सर्व बीआरटी मार्गांवर लवकरच पहायला मिळणार आहे. यामुळे शहराच्या स्मार्ट सिटी या संकल्पनेत एका नवीन तंत्रज्ञानाची भर पडणार आहे.