
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पिंपरी :- पिंपरी चिंचवड चे भाजपाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती काल अचानकपणे खालावली, त्यामुळे त्यांना ताबडतोब बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आमदार जगताप हे अत्यंत धडाडीचे व लोकप्रिय आमदार म्हणून या भागात प्रसिद्ध आहेत. त्यांनी अल्पावधीतच वाखाणण्याजोगी विकासाची भरपूर कामे केली आहेत. काही कामे प्रगती पथावर आहेत.
प्रकृती विषयी अजून सविस्तर अहवाल न आल्यामुळे नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. “आमदार जगतापांच्या प्रकृती मध्ये आता झपाटय़ाने सुधारणा होत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या तब्येतीविषयी आणखी एक दोन चाचण्यांचे नियमीत अहवाल अपेक्षित असून आमदार साहेबांना दोन दिवसात घरी सोडतील, त्यामुळे कोणीही काळजी करू नये असे सहकारी आमदार महेशदादा लांडगे यांनी पत्रकारांना सांगितले.”