
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- पीएमपीकडून सिंहगडावर ई-बससाठी गुरुवारी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून, 200 केव्ही (किलोवॅट) ट्रान्सफॉर्मर येथे नुकताच बसविण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच खासगी वाहनांना सिंहगडावर बंदी केली जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत येथील चार्जिंग स्टेशनचेही उद्घाटन होणार आहे.
सिंहगडावर खासगी वाहनांमुळे प्रदूषण व वाहनकोंडी होते. त्यामुळे किल्ल्यावर खासगी वाहनांना बंदी करण्यात यावी, अशी मागणी होत होती. याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी याची तत्काळ दखल घेतली. येथील खासगी वाहतूक बंद करून ग्रीन एनर्जीद्वारे पर्यटकांना वाहतूक पुरविण्याचे काम पीएमपी कंपनीने करावे असा प्रस्ताव पुढे आला आहे, पुण्यात त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.