
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
भरत पवार
लोहा :- दिनाक १५ एप्रिल रोजी दैनिक चालु वार्ता चे मुख्य संपादक डी एस लोखंडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय लोहा येथे फळे वाटप करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत चिकाटी व जिद्दीच्या जोरावर एक नामवंत संपादक होऊ शकतो याचे ताजे उदाहरण म्हणजे संपादक डी एस लोखंडे पाटील होय. त्यांनी दैनिक चालु वार्ता वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेशी संपर्क करत आहेत.
त्यामुळेच आज ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. वर्तमानपत्र चालवण्यासाठी जे काही वैचारिक लेख, संपादकीय लेख, जनरल नॉलेज, विविध वनस्पतींची माहिती, क्रीडा विषयकमाहिती,ताज्या बातम्या, शब्दकोडे,मुलाखती ,स्पर्धा परीक्षा प्रश्न ,चित्रकला याची माहिती दररोज पेपर ल देत आहेत, यासाठी अहोरात्र परीश्रम करून चांगल्या पद्धतीने संपादक म्हणून त्यांचे कार्य चालू आहे.
थोड्याच दिवसात त्यांनी महाराष्ट्रामधील अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे, गोरगरिबांच्या प्रश्नांची त्यांनी नेहमीच दखल घेऊन त्या समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे असे असणारे Dashing संपादक श्री. डी. एस. लोखंडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय लोहा येथे दैनिक चालु वार्ता चे महाराष्ट्र उपसंपादक भरत पवार व दैनिक चालु वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी माधव गोटमवाड यांच्या आयोजनाखाली ग्रामीण रुग्णलयामध्ये फळे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित लोहा नगरपालकेचे मा.उपनगराध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक शरद पाटील पवार ,दैनिक चालु वार्ता जांब प्रतिनिधी किरण गोंड,महाराष्ट्र विकास आघाडी चे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार शुभम सावकार उत्तरवार,दैनिक चालु वार्ता चे पेनुर सर्कल प्रतिनिधी राम कराळे,राम मनिका बुद्रुक, डॉक्टर प्रशांत जाधव साहेब , बाळू पाटील कोरडे ,रवी वाघमारे ,बंटी व ग्रामीण रुग्णालय लोहा येथील पूर्ण स्टॉप यावेळी उपस्थित होता.