
दैनिक चालु वार्ता
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
विश्वास खांडेकर
नांदेड :- आज दि १५/०४/२०२२ दैनिक चालू वार्ता चे मुख्य संपादक .एस. लोखंडे पाटील सर यांचा जन्मदिवस . नावाप्रमाणेच ज्ञानी, बुद्धिमान असणारे आमचे सर एखाद्या परीसा प्रमाणेच आहेत. त्यांनी स्पर्श करावा आणि माणसांचे सोने व्हावे, हे वारंवार आपल्याला आढळून येते. कंधार तालुक्यातील एका छोट्याश्या गावात सरांचा जन्म झाला. सामान्य कुटुंबातील हा मनुष्य लहानपणापासूनच आत्मविश्वासू, प्रतिभासंपन्न, आणि मोठी स्वप्न पाहणारा आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रमानी त्यांनी पुणे शहर गाठले ,या शहरात मराठवाड्यातून आलेला, एका खेड्यातील तरुण काय करेल? असे विविध प्रश्न त्यांच्यासमोर होते. परंतु या सर्व गोष्टींना बगल देऊन त्यांनी अपार मेहनतीतून पुण्यासारख्या मोठ्या शहरात देखील आपलं अस्तित्व निर्माण केले .
समाजसेवेच्या भावनेतून प्रेरित होऊन दैनिक चालू वार्ता सारखा एक सामाजिक उद्देश बाळगणारा, सत्याची कास धरणारे, सत्याच्या मार्गावर चालणारे वर्तमानपत्र निर्मान केले. या काळात त्यांच्याजवळ अनेक व्यक्ती आले, या सर्व व्यक्तींना .एस. लोखंडे पाटील सर सरांचा स्पर्श झाला. फक्त स्वतःची प्रगती न करता त्यांनी त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या अनेक मित्रमंडळी ,सहचर या सर्वांची प्रगती घडवली. आर्थिक-सामाजिक अशा विविध क्षेत्रात लोकांना सन्मानाने उभा करण्याचे कार्य त्यांनी केले. जणू परिसाचा एकदा स्पर्श व्हावा आणि ती वस्तू सोन्यात रूपांतरित व्हावी ,अगदी त्याप्रमाणेच सरां जवळ आलेल्या सर्व लोकांना या ज्ञानरूपी परिसाचा स्पर्श झाला आणि ते सर्व लोक बुद्धी, सामर्थ्य, ज्ञान, सामाजिकक्षेत्र या सर्व क्षेत्रात प्रगती करू लागले. त्यामुळे सरांना खरोखर परिस म्हनणे योग्य ठरेल.
या व्यक्तीने नुसती आर्थिक प्रगती केली नाही तर आता समाजसेवेला देखील वाहून घेतले आहे .समाजात होणाऱ्या विविध अन्याय त्यांना वाचा फोडण्यासाठी ते दिवसातील 16 तासांपेक्षा जास्त कार्य करतात .त्यांच्यामुळे आता पूर्ण महाराष्ट्रभर दैनिक चालू वार्ताचे एक जाळे पसरले आहे. अल्पावधीतच दैनिक चालू वार्ता एका फार मोठ्या प्रगतीपथावर आहे, आणि याचे पूर्ण श्रेय फक्त सरांना जाते. त्यानीं आपल्या वर्तमानपत्रा करिता समाजातील योग्य लोकांची निवड करून, थोडक्यात हिऱ्यांची निवड करून या वर्तमानपत्राला एक नवा आयाम प्राप्त करून दिला आहे .अशा या ज्येष्ठ, श्रेष्ठ, समाजप्रबोधनकार,ज्ञानी, बुद्धीमंत, होतकरू, आत्मविश्वासू व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे याकरिताच ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहोत.
ईश्वराने या व्यक्तीला दीर्घायुष्य देऊन महाराष्ट्रावर उपकार करावेत हीच भावना मनात ठेवून आम्ही सर्व दैनिक चालू वार्ताचे नांदेड सदस्य त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो.