
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. मनसेच्या या मोहिमेला राष्ट्रवादी काँग्रेसने अनोख्या पद्धतीने उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा रोजा सोडण्यात आला. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात शुक्रवारी (15 एप्रिल) संध्याकाळी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.