
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई, :– 3 मेपर्यंत मिशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा वाचली जाईल अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. मनसेच्या भूमिकेबाबत आता भाजपनेही सूरात सूर मिसळला आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबईतील मंदिरांत मोफत भोंग्यांचे वाटप सुरु केले आहे.
हनुमान जंयती निमित्त मुंबईतील मंदिरांमध्ये 1 हजाराहून अधिक भोंगे वाटप केले जातील असे कंबोज म्हणाले. आणखी अर्ज आल्यास त्याची पडताळणी करुन त्यांना सुद्धा भोंगे दिले जातील, असे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे. मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी आम्ही हे करत असल्याचे कंबोज यांचे म्हणणे आहे.