
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.१५.गेल्या दोन-तीन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या घरात साजऱ्या केल्यामुळे यावर्षी निर्बंध हटविल्या आल्यामुळे यावर्षीची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली, भारतीय संविधानाच्या माध्यमातून ओळख निर्माण करणारे घटनेचे शिल्पकार बहुजन नायक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती गुरुवार दिनांक 14 एप्रिल रोजी नांदुरा तालुक्यातील केदार गावांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
केदार गावातील नागरिकानी उत्साहात जयंती साजरी केली, तसेच भोजनदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, या कार्यक्रमाला सरपंच पती ज्ञानेश्वर ढोले,लाईनमन अनिल वावगे, माजी ग्रामपंचायत सदस्य शरद पठाडे, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर इंगळे,राजेश इंगळे, श्रीराम जकाते, विनायक पठाडे,अनंता बजारे, नितीन इंगळे विजय महोकार, संदीप बाजारे, संघपाल इंगळे,अतुल पठाडे,विष्णू इंगळे,महिला मंडळी आणि समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.