
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
जळगाव :- ‘जेम्स लेननं जिजामातांबद्दल अत्यंत गलिच्छ लिहिले होते. त्यांचं कौतुक बाबासाहेब पुरंदरेंनी सोलापूरच्या सभेत केलं होतं. एवढंच नाहीतर शिवजयंती तारखेनुसार करावी की तिथीनुसार याबद्दल माफी मागितली होती’ असं पुराव्यानिशी वाचून दाखवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कान उपटले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
हे जळगावच्या दौऱ्यावर आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना मनसेच्या पत्राच्या शरद पवारांनी केराची टोपली दाखवत राज ठाकरेंची चांगलीच कानउघडणी केली.
‘जेम्स लेन या इंग्रजी लेखकाने शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही तरी लिहिले होते. शहाजी महाराज बाहेर होते. जिजामाता या शिवनेरी किल्ल्यावर होत्या. दादाजी कोंडदेव तिथे होते. अत्यंत गलिच्छ लिखान हे जेम्स लेनने लिहिले होते. याबाबत बाबासाहेब पुरंदरे यांनी सोलापूरला भाषण केलं होतं. यावेळी त्यांनी जेम्स लेनचं कौतुक केलं होतं. जेम्स लेन हे चांगले शिवअभ्यास आहे. असे उद्गगार बाबासाहेबांनी काढले होते. त्यानंतर शिवभक्तांमध्ये अत्यंत तीव्र नाराजी निर्माण झाली होती, असं पवारांनी वाचून दाखवत राज ठाकरेंचे कान उपटले. (मनसेला राष्ट्रवादीचं ‘पुरोगामी’ उत्तर? हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन) तसंच,पुरंदरे यांनी आणखी एक प्रश्न उपस्थितीत केला होता.
शिवजयंती कधी साजरी करावी. तिथी नुसार करावी की इंग्रजी कॅलेंडरनुसार करावे की, याबद्दल बाबासाहेब पुरंदरे यांनी ५ फेब्रुवारी २००१ रोजी त्यांच्या स्वत:च्या हाताचे पत्र आहे, शिवजयंती तारखेप्रमाणे साजरी करावी असे माझे मत आहे, शासनाला कळवले आहे. तिथीनुसार साजरी करावी याबद्दल कालनिर्णयकार साळगावकर यांना सल्ला दिला होता. त्यामुळे शिवभक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याबद्दल मी माफी मागतो. हे पुरंदरे यांनी लिहिलं आहे’ असं पत्रच पवारांनी वाचून दाखवलं. ‘पहिले ते जेम्स लेन याने गलिच्छ लिहिले होते, त्याचे कौतुक पुरंदरे यांनी केलं होतं हे म्हणणं सुद्धा गलिच्छ होतं. शिवजंयतीबाबत तर त्यांनी माफी सुद्धा मागितली. मग यावर जास्त बोलून काय उपयोग नाही’ असंही पवार म्हणाले.