
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
थायरॉईड एक महत्त्वपूर्ण फर्टिलिटी ग्रंथी आहे आणि फर्टिलिटी हार्मोन्स मध्ये गडबड झाल्यास स्त्रीला गरोदर राहण्यास समस्या निर्माण होतात. यामुळे स्त्रीच्या गर्भधारणेवर मोठा परिणाम होतो. गर्भधारणेची क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी होते. थायरॉईड ग्रंथी योग्य प्रकारे काम करत नसेल तर हार्मोनल असंतुलन सुद्धा होऊ शकते. थायरॉईड मुळे गर्भधारनेवर परिणाम होऊ शकतो आणि अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कुठल्याही स्त्रीच्या गरोदरपणात साधारणपणे थायरॉईड ग्रंथी आणि हार्मोन्समध्ये बदल नैसर्गिकरित्या होत असतात. या बदलांचा गर्भाच्या वाढीवर परिणाम होत असतो. त्यामुळे गरोदरपणातील थायरॉईडचे आजार व तपासणीबाबत जागरूकता असणं आवश्यक आहे.
hyper म्हणजे जास्त असणे, hypo म्हणजे कमी असणे या दोन्ही परस्तिथी मध्ये गर्भवती स्त्री वर कोणता ना कोणत्या स्वरूपात दुष्परिणाम होण्याचा धोखा असतो. साधारणपणे पंधराशे स्त्रियांपैकी एका स्त्रीमध्ये हा विकार आढळतो. थायरॉड च्या त्रासाची लक्षणे ही प्रेग्नन्सी च्या लक्षणाशी मिळती जुळती असल्यामुळे बऱ्याचदा ही थायरॉईडची लक्षण आहेत अस लक्षात येत नाही.
वेळेत निदान न झाल्यामुळे आईला आणि बाळाला दोघांनाहीं त्याचे दुष्परिणाम भोगावे लागते. गरोदरपणात वजन घटणं, अतिरिक्त प्रमाणात उलट्या होणं, छातीत धडधडणं, पायावर सूज येणं, थकवा येणं , गर्भाच्या हृदयाचे ठोके वाढणं, गर्भाची वाढ खुंटणं, मृत मूल जन्माला येणं, अपुऱ्या दिवसांचं बाळ जन्माला येणं, बाळामध्ये जन्मजात दोष निर्माण होणं, नवजात अर्भकाला हायपरथायरॉईडीझम होणं.
प्रेग्नन्सी मध्ये थायरॉईड चा त्रास कसा ओळखायाचा?
प्रेग्नसी लक्षणा मध्ये , शौचास साफ न होणे, चित्त विचलीत असणे, लक्षात न राहणे, थंड वातावरण सहन न होणे, स्नायू कमजोरी ही लक्षणे आत्याधिक प्रमाणात जाणवतात. त्याच बरोबर हृदयाचे ठोके जलद होणे , अतीप्रमाणात उलट्या होणे, हाताला कंप जाणवणे ,शांत झोप न लागणे, जीव घाबरल्या सारखं वाटणे ही लक्षणे असतील तर हायपरथयरॉईड ची शक्यता पडताळून पाहायला हवी. गर्भावस्थेत पहिल्या तीन महिन्यात बाळाची थायरॉईड ग्रंथि ही thyroid हॉर्मोन चे secretion करण्यास एवढी सक्षम नसते, त्यामुळे बाळ पूर्णतः आईच्या thyroid hormone वर अवलंबून असतं. म्हणूनच गर्भवस्थेत पाहोळ्या तीन महिन्या मध्ये thyroid च लेवल नॉर्मल असणे महत्वाचे आहे. म्हणूनच पहिल्या तीन महिन्यात आईला thyroid ची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.
निरोगी जीवनशैली आणि पौष्टिक आहार घेत थायरॉइड ग्रंथीच्या अकार्यक्षमतेमध्ये सुधारणा आणता येते. याशिवाय औषधांच्या सेवनाने सुद्धा थायरॉइड नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. थायरॉइडने ग्रस्त असलेल्या स्त्रियांनी कॉफी ,चहा, सोयाबीन ,रताळ, कोबी, फ्लॉवर , शेंगदाणे व अधिक खाणे टाळले पाहिजे. याशिवाय तळलेले मसालेदार पदार्थ आणि मिठाचा त्याग केला पाहिजे. thyroid च्या रुग्णांनी भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ , पालेभाज्या,फाळभाज्या, कच्चे सलाड, मोड आलेले कडधान्य, जांभूळ, द्राक्ष, टोमॅटो, अक्रोड, दही , यासारखे पदार्थ खायला हवेत. अँटीऑक्सीडेंटमुळे स्ट्रेस देखील कमी होतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थायरॉइड असणाऱ्या स्त्रीने गर्भधारणेपूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. जेणेकरून काही समस्या असल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतील.