
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी सुरू असून त्यांच्या सीबीआय कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडीची याचिका फेटाळली आहे. चारही आरोपींना आता 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.