
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- जगभरात कोरोनाचा प्रभाव न्यून झाला असून निर्बंधही उठवण्यात आले आहेत; मात्र ज्या चीनमधून कोरोनाची उत्पत्ती झाली, त्या चीनच्या शांघाय शहरात संपूर्ण दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. चीनच्या ‘शून्य कोरोना’ धोरणामुळे शहरातील अडीच कोटी नागरिक घरातून बाहेर पडू शकत नाहीत. चीनच्या ५ प्रांतांमध्ये आंशिक दळणवळण बंदी आहे. १५ कोटी लोकांना याचा फटका बसला आहे.