
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दोन ते तीन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. यातच आता रशियाने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या देशात येण्यास बंदी घातली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रशियाने म्हटले आहे की, ”आम्ही ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन , परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस आणि इतर अनेक कॅबिनेट मंत्र्यांना देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. युक्रेनविरुद्ध युद्ध सुरु झाल्यानंतर मॉस्कोला एकाकी पाडण्यासाठी ब्रिटनने लादलेल्या निर्बंधांना प्रतिसाद म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.”