
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
जळगाव :- महाविकास आघाडीचे दोन मंत्री तुरुंगात आहेत. किमान आता तरी गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा आणि 2-4 भाजप नेत्यांना तुरुंगात पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर शरद पवारदेखील उपस्थित होते. सभेत खडसे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही चांगलेच ताशेरे ओढले. जे एकेकाळी माझे पाय धरायचे.
माझा आशीर्वाद घ्यायचे, ते आज माझ्याविरोधात आणि शरद पवारांविरोधात बोलत आहेत, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. कालच देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 14 ट्वीट करत शरद पवारांवर हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका केली होती. याचा संदर्भ देत एकनाथ खडसेंनी फडणवीस यांचा आज समाचार घेतला.