
दैनिक चालु वार्ता
विशेष प्रतिनिधी
निरज तांडेल
पुणे :- देशाची ताकद आपल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक विविधतेत आहे. सर्वधर्मियांनी एकत्रित येऊन सण-उत्सव साजरे करणं ही आपली परंपरा, संस्कृती आहे. स्वधर्माचा अभिमान बाळगताना अन्य धर्मियांच्या परंपरांचा आदर करण्याची पूर्वजांची शिकवण आहे. या शिकवणीचं पालन हनुमान जयंतीनिमित्त पुण्यात कर्वेनगर इथल्या हनुमान मंदिरात मुस्लिम बांधवांच्या हस्ते श्रीहनुमानजींची आरती करून करण्यात आलं.
राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हनुमान चालीसाचं पठण करुन हनुमान जयंती साजरी केली. सोहेल शेख यांनी रमझानचं दुवा पठण केलं. हनुमान मंदिराच्या प्रांगणात हिन्दू-मुस्लिम बांधवांनी रोजा-इफ्तारचा सहआनंद घेऊन सर्वधर्मसमभावाचं, एकता-बंधुतेचं अनोखं दर्शन घडवलं. सर्वधर्मीयांना सोबत घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवण्याचं कार्य राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता यापुढेही करत राहील.