
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजुर्डे पाटील
गंगापूर :- औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी लासुरटेशन कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गंगापूर, खुल्ताबाद, कन्नड ,वैजापूर तसेच इतर तालुक्यातील शेतकरी दररोज मोठ्या प्रमाणात आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात.त्यांना साध पिण्यासाठी चांगले पाणी बाजार समितीतून बाजार समिती उपलब्ध करून देत नाहीत.अशी समशा काही शेतकर्यांनी शेतकरीनेते इंजी.महेशभाई गुजर यांच्या कडे मांडली.
त्या अनुषंगाने बाजार समितीची परिसराची पाहणी केली असता, काही वर्षापूर्वी सामाजिक कार्यकर्ते यांनी पाणपोई उभारली होती व बाजार समितीने बसवले वाटर कुलरची दुरावस्था झालेली दिसून येते आहे . बाजार समिती परिसरात येणार्या शेतकर्यांना ,नागरिकांना १०/१५ रुपयाला पाणी विकत घेऊन प्यावे लागत असेल व लाखो रुपये खर्चून सामाजिक कार्यकर्त्यांनी बांधलेल्या पाणपोई उभारून दिली ती सुद्धा बाजार समितीला निट वापरता येत नसेल तर हि अत्यंत शरमेची बाब आहे.
ज्या शेतकर्यांच्या जिवावर नफ्यात आलेली बाजार समितीत रोज लाखो रूपयांचा आर्थिक व्यवहार होत असेल तर अशा ठिसाळ कारभाराची चौकशी झाली पाहिजे अशी भावना शेतकर्यांच्या मनात निर्माण झाली आहे.त्यामुळे उन्हाळ्याची तिव्रता वाढत असताना माणुसकीच्या नात्याने का होईना शेतकरी,नागरिकांसाठी चांगले पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी इंजी महेशभाई गुजर यांनी विडीओ च्या माध्यमातून लासुरस्टेशन बाजार समिती सभापती, उपसभापती, संचालक मंडळाला विडीओ च्या माध्यमातून
केली आहे.