
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी ता. कोरेगांव
संभाजी गोसावी
कोरेगांव :- करंजखोप गावचे कै. यशवंतराव विनायकराव धुमाळे यांचे अल्पशा आजारांने आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. यशवंत धुमाळ यांचा स्वभाव मनमिळावू होता त्यांच्या जाण्यांने समस्त धुमाळ परिवारांस संपूर्ण परिसरांत शोककळा पसरली. धुमाळ यांनी एसटी महामंडळ मध्ये मुंबई याठिकाणी त्यानंतर त्यांना आपल्या तालुक्यांच्या ठिकाणी कोरेगांव आगरांमध्ये प्रवाशांची सेवा करण्यांची संधी मिळाली त्यांनी अगदी सेवानिवृत्ती पर्यंत तालुक्यांच्या ठिकाणी एसटी आगरमध्ये चालक या पदावर ते कार्यरत होते. त्यामुळे धुमाळ हे परिसरांतच नव्हे तर संपूर्ण कोरेगांव तालुक्यांमध्ये चांगलेच परिचित होते त्यांच्या जाण्यांने समस्त धुमाळ कुटुंबिय यांच्यासह करंजखोप ग्रामस्थसह संपूर्ण कोरेगांव तालुक्यांतून हळहळ व्यक्त होत आहे. धुमाळ यांच्या पश्चांत पत्नी दोन मुली मुलगा सून नातवंडे असा त्यांचा परिवार होता.