
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- ठाण्यातील मनसेची ‘उत्तर सभा’ झालेनंतर राज ठाकरे यांनी आपला मोर्चा औरंगाबाद व अयोध्याकडे वळवला आहे. राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा पार पडेल. तर ५ जून रोजी ते अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिली. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. आणि त्यांनी अवघ्या दहा मिनिटात पत्रकार परिषद आटोपली.
सुरुवातीला त्यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत सांगितले की, हा मुद्दा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. भारतातील मुस्लीम हे देशापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून भोंगे उतरावेच लागतील. तसेच, भोंगे काढण्याबाबत ते ऐकत नसेले तर जशास तसे उत्तर देण्याची तयारी देखील आम्ही केलेली आहे, असा इशारा त्यांनी दिला.