दैनिक चालु वार्ता
नवनाथ यादव
भूम तालुका प्रतिनिधी
भुम :- महाराष्ट्रातील अग्रगण्य असणारी एन टीव्ही मराठी वृत्त वाहिनी च्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती आदी विषयावर उल्लेखनीय एन टी व्ही मराठी च्या माध्यमातून वृत्तांकन करून लोक भिमुख बातम्या दिल्या असल्याने महाराष्ट्रातील काही प्रतिनिधींना एन टीव्ही चा रत्न पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार एन टीव्ही चे भूम प्रतिनिधी गौस शेख यांना संपादक इक्बाल शेख यांनी जाहीर केला असून हा पुरस्कार एक मे 2022 रोजी वर्धापन दिनी दिला जाणार आहे.
भूम चे विकासरत्न नगरपालिका गटनेते संजय गाढवे यांनी पत्रकार गौस शेख यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रसंगी जेष्ठ पत्रकार सुनील डुंगरवाल, प्रमोद कांबळे, अब्बास सय्यद, आशिष बाबर, नवनाथ यादव वसीम काजलेकर, नगरसेवक संजय पवार, रईस काजी, मामु जमादार,मुशीर काजी बाळासाहेब गवळी, लालू पवार, सुनील थोरात,संदीप गाढवे आदी उपस्थित होते