
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- दि:-१८/४/२०२२ रोजी सकाळी माॅर्निंग वाॅकला धसवाडी ते ढाळेगांव ता.अहमदपुर जि. लातूर येथे गेले असता रस्त्यालगत एक काळवीट जखमी अवस्थेत पडलेले निदर्शनास आले असता त्यांनी वनअधिकारी व वन कर्मचारी यांना मोबाईलव्दारे संपर्क साधला व काळवीटास औषधोपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना ता. अहमदपुर येथे खाजगी वाहन करुन संदर्भ सेवा उपलब्ध करुन पाठवण्यात आले आहे.त्यामुळे श्री नाना दुर्गे यांनी मा.कलशेट्टी साहेब वनअधिकारी व श्री गडदे कर्मचारी यांचे तत्पर सेवा दिल्याबद्दल विशेष कौतुक केले आहे व आभार मानले आहेत.नाना दुर्गे यांचेही या परिसरात कौतुक होऊन अभिनंदन होत आहे.