
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट :-दि,१६ एप्रिल मौजे ईरेगाव येथे हनुमान जयंती सर्व गांवकऱ्यांच्या वतीने साजरी करण्यात आली तरी गावातील सर्व हनुमान भक्त भजनी मंडळी व भाविक भक्तांनी उपस्थिती होती गावातील हनुमान भक्त पुजारी वामन सटवाजी मिराशे यांच्याहस्ते पूजा अभिषेक करण्यात आला आहे.तरी गावातील सर्व महिला व पुरुष,बाळगोपाळ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हनुमान जयंतीनिमित्त व बजरंगबली पवनपुत्र यांच्यासमोर वेगवेगळ्या आरती गाणे हनुमान भजनी मंडळी मौजे ईरेगाव कडून हनुमान जयंती सर्व गावकऱ्यांच्या मदतीने मोठ्या संख्येने व उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.यांचा लाभ ईरेगाव परीसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन गांवकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.