
दैनिक चालु वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधि
कवी सरकार इंगळी
कोल्हापूर :- हुपरी .ता .हातकणंगले. जि कोल्हापूर येथे दुसऱ्यांदा कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित ११ वे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, रविवार दि २४ एप्रिल २०२२रोजी छत्रपती शाहू वाचनालय हुतात्मा स्मारक हुपरी येथील हाॅलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९.३०वा .संमेलनास सुरवात होणार असून सदर साहित्य संमेलनास अध्यक्ष प्रसिद्द साहित्यक,व विचारवंत वक्ते प्रा,डाॅ.सुरेश विष्णू कुराडे गडहिंग्लज हे भूषवणार असून संमेलनास उद्घाटन माणगांवचे सरपंच मा,राजू मगदूम यांचे हस्ते होणार आहे. तर कविसंमेलन अध्यक्ष कवी ,गझलकार सिराज शिकलगार आंदळी आणि प्रमुख पाहुणे विनोदी कथाकथनकार लेखक प्रा,शांतीनाथ मांगले बलवडी ता खानापूर ,जि,सांगली. हे उपस्थीत राहाणार आहेत.संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मा, यशवंतराव पाटील (दादा) हुपरी हे असून,हुपरी नगरपालिका प्रथम नगराध्यक्षा सौ,जयश्री महावीर गाट यांचे हस्ते फोटो पुजन करणेत येणार आहे. संमेलनात!! साहित्य आणि समाज परिवर्तन !!या विषयावर परिसंवाद होणार असून यासाठी डा,अनिता खेबूडकर अध्यक्षा असून, मा,प्रा,किरण नाईक सर आणि सौ पल्लवी ढवळे हे सहभागी होणार आहेत.
त्याचप्रमाणे संमेलनात प्रसिद्ध साहित्यिक सितायणकार लेखक प्रा, किसणराव कुराडे शिवराज काॅलेज गडहिंग्लज, यांचे हस्ते कवि सरकार इंगळी यांच्या !!हिरवा माझा मळा!!या काव्यसंग्रहाचे ,व साहित्य संमेलन विशेषांकाचे प्रकाशन आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या साहित्यकांना, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, संमेलनास मा,अमित गाट,नानासो गाट,लेखक मनोहर भोसले , मा सरपंच महादेव माने वनवासमाची (कराड) मा .प्रा,चंद्रकांत पोतदार, मा,रावसाहेब पाटील (चेअरमन जवाहर बेंक हुपरी) मा,जंबूकुमार देसाई इंगळी, मा दत्तात्रय पाटील इंगळी.अ््ड कवी, विजय कांबळे,मुंबई कवी मधूकर हूजरे उस्मानाबाद , हे उपस्थीत असणार आहेत. तसेच तिसऱ्या सत्रात कविसंमेलनात सुत्रसंचालन कवियत्री सौ,अश्विनी पाटील शिरटी करणार असून सहभागी कवी मा, पत्रकार ,कवि,भारत कवितके,मुंबई, भरत लोहार सातारा,कवि गौरव खतकल्ले ,कृष्णात कोरवी सर,पत्रकार प्रशांत भोसले रूकडी, कवियत्री श्लैषा कांरंडे,सोलापूर कवी,अशोक पवार कडेगांव ,मा कवी बा ह.मगदूम पुणे, सौ,मीनल कुडाळकर सांगली कवि सात्तापा सुतार,हुपरी,सौ,सिमा बरगाले कारदगा ,बाबा जाधव रूई, ,ल.बा.खोत.,महादेव कुशाप्पा,ऋजुता माने मिरज ,गीतकार ,दस्तगीर नदाफ सौ,आरती लाटणे,कवि बळीराम कदम चंदूर, सौ,सुवर्णा पवार, तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्हातील साहित्यक उपस्थीत राहाणार असून हुपरीचे छत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालयाचे सर्व पदाधिकारी आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित कमिटी संमेलन आयोजक कवी सरकार इंगळी, अध्यक्ष प्रकाश कोळसे,बाबा जाधव, रमेश जयसिंग लोंढे संमेलन यशस्वी करणेसाठी प्रर्यंत करीत आहेत असे कवी सरकार इंगळी यांनी हे प्रसिद्घीपत्र प्रसिद्दी दिले आहे.