
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
अक्कलकुवा :- आदिवासी विकास विभाग मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रुपसिंग वसावे यांनी निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा तालुक्यातील कोलवीमाल ते कंकाळामाळ रस्त्याचे रस्त्याचे काम गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते.सदर काम हे अर्धवट असल्याने तीन वर्षापासून वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे दगड कोसळल्याने या रस्त्यावरुन वाहतूक करता येत नाही . सदर रस्ता हा अनेक गावांना जोडत असून हा रस्ता अर्धवट असल्याने अनेक गावांशी संपर्क होत नाही.
सदर रस्ता हा कोलवीमाल ते कंकाळामाळ ३ ते ४ किलोमीटर असा असून या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण झाल्यास अनेक समस्या सुटणार आहे त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती होणे गरजेचे आहे.फक्त ३ ते ४ किलोमीटर रस्त्याचे काम झाले नसल्याने कोलवीमाल येथील लोकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळे सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे. व लोकांची होणारी गैरसोय तात्काळ थांबवावी.
कोयलीविहीर ते कोलवीमाल हा रस्ता प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गेल्या १० वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आला असून त्यानंतर एकदाही रस्ता दुरूस्ती करण्यात आला नाही.या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातास कारणीभूत ठरु पाहत आहेत.तरी या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रुपसिंग वसावे यांनी निवेदनाद्वारे केली आहे