
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- पुण्यात सध्या कडक उन्हाळा असून तापमानाचा पाराही कमाल मर्यादेच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे नागरिकां बरोबर संचार करणारे पशु पक्षांनाही ह्या उष्णतेचा त्रास जाणवू लागला आहे.अशा परिस्थितीत त्यांची तहान भागविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ही गरज व अडचण लक्षात घेऊन पुण्यातील “पुणे सोशल” या सामाजिक संस्थेने आज कोथरूड भागात पक्षांसाठी पाणी पिण्याच्या भांड्यांचे मोफत वाटप केले. ह्या प्रसंगी संस्थेचे प्रमुख अॅड. अभिषेक जगताप म्हणाले कि, “सध्याच्या तापमानात पाण्याअभावी उष्मघातामुळे अनेक पक्षांचे तहानेसाठी खूप हाल होत आहेत; काही पक्ष मृत्यूमुखी पडले आहेत.
हे लक्षात घेऊन व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने आम्ही २०-२५ एनजीओ संस्था एकत्र येवून मानवतेच्या दृष्टीने पक्षांसाठी पिण्याच्या पाणीभांडी वाटपाचा एक सामाजिक उपक्रम घेतला आहे. नागरिकांनी ही भांडी घरी घेऊन जावीत आणि आपल्या परिसरात पक्षी येतील अशा मोक्याची ठिकाणी भांडी ठेवावीत. २००० भांडी वाटपाचा उपक्रम पुण्यात विविध ठिकाणी राबविण्यात येईल.”