
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आर टी ई) विद्यार्थ्यांना आॅनलाईन लॉटरीद्वारे प्रवेश देण्याचे निश्चित झाले असले तरी अद्याप राज्यातील १४६४४ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची पूर्तता केली आहे. त्यात पुण्यातील सर्वाधिक म्हणजे २८९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे लाॅटरी नंतरही प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचे आढळून आले आहे. पुण्यात आरटीई द्वारे देण्यात येणाऱ्या शाळांची संख्या ९५७ असून त्याद्वारे १५१२६ जागांसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ९२९६० प्राप्त अर्जांपैकी १४९८० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. प्रवेशासाठी २० एप्रिलपर्यंत अंतीम मुदत देण्यात आली आहे.