
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- पुणे शहरातील वारसा स्थळांमध्ये ऐतिहासिक वाडे, पर्यटन स्थळे अशा 250 हून अधिक वास्तू आहे. या ठिकाणी प्रामुख्याने स्वच्छता, सुविधा, स्वच्छतागृह आदीबाबतच्या अडचणी दूर व्हायला हव्यात. वारसा स्थळांबाबत अनेक अडचणी आहेत.
त्यावर केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण पुणेकर म्हणून काय करू शकतो, याविषयी आखणी करणे गरजेचे आहे. वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग देखील गरजेचा असल्याचे मत “हेरिटेज’ क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केले.
जागतिक वारसा दिनानिमित्त “सेव्ह हेरिटेज’ या चळवळी अंतर्गत “वारसा जागर’ या चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये इतिहास अभ्यासकांनी भाग घेतला. विश्रामबागवाडा, नानावाडा, आगाखान पॅलेस, मंडई आदी ऐतिहासिक वास्तूंमध्ये उपक्रम राबविले जात होते. मात्र ते आजमितीस बंद आहेत. त्यामुळे ते पुन्हा चालू करून वारसा स्थळे समृद्ध करण्याकरिता एक आराखडा देखील आखण्याचा निर्धार चर्चासत्रात करण्यात आला. यासह अनेक जुने वाडे आजही उत्तम अवस्थेत असून त्यांचे संवर्धन होवून त्यांना जगप्रसिद्धी मिळावी ही अपेक्षा.