
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे / मुंबई :- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून (सोमवार) देशभरातील सर्व बँकेच्या उघडण्याची वेळ सकाळी ९ वा वाजताची असणार आहे. म्हणजेच अतिरिक्त तासामुळे आता ग्राहकांची प्रलंबीत कामे वेळेत पूर्ण होतील. महत्वाचे म्हणजे बँकांची बंद होण्याची वेळ आहे तीच रहाणार आहे. त्यावेळेत कोणताही बदल नाही फक्त सकाळच्या वेळेत मात्र बदल करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात पूर्वी वेळेत बदल करण्यात आला होता; आता वेळ पूर्ववत करण्यात आली आहे याची नोंद ग्राहकांनी घ्यावे असे आरबीआय ने कळविले आहे.