
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यापासून संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आयएनएस विक्रांत कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बाप-बेटे तुरुंगात जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यातच आता सुपाऱ्या घेऊन काम करणाऱ्यांना शिव्या देणार नाही तर काय करणार, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी दिल्लीत जाऊन प्रेझेंटेशन दिले.
अशांना शिव्या द्यायच्या नाही तर काय करायचे, असे विचारत संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास काढून पाहा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्यांना जोड्याने मारले पाहिजे. विक्रांत गैरव्यवहार प्रकरणी बाप-बेटे तुरुंगात जाणारच, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. संयुक्त महाराष्ट्रातील आमच्या नेत्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांना यापेक्षाही भयंकर भाषा वापरली आहे. गेली अनेक दशके मी संपादक आहे, सार्वजनिक जीवनात काम करतो, मात्र, याच व्यक्तीबाबत मी अशी भाषा का वापरतो, अशी विचारणा करत, यासंपूर्ण गोष्टीचे चिंतन त्यांनी करावे, असा सल्ला संजय राऊतांनी केला. ते टीव्ही९च्या मुलाखतीत बोलत होते.