
दैनिक चालु वार्ता
घूग्घूस प्रतिनिधी
प्रदिप मडावी
घूग्घूस :- घुग्घुसची लोकसंख्या जवळपास पन्नास हजारावर आहे,पाणीचे समस्यांना नागरिकाना तोंड द्यावा लागते, वाळूमाफिया घुग्घुस,वडा,चिंचोली, घाटावर सक्रिय झाले असून राजरोसपणे वाळूमाफिया मुजोरीने धुमाकूळ सर्रास पणे रेती वाहतूक करित आहे. नकोडा येथील वर्धा नदीच्या चिचोली रेती घाटा कडे जाणाऱ्या रस्त्यालगत अवैध रेती साठा जमा करून असल्याची माहिती मिळताच मंडळ अधिकारी किशोर नवले, तलाठी राहुल भोंगळे, परशुराम पेंदोर यांनी मिळताचा चिचोली रेती घाटाच्या मार्गा जवळ धाड टाकून अवैध रेती साठा जप्त केला. महसूल विभागाच्या धाडीने अवैध रेती तस्करांत खळबळ उडाली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून नकोडा येथील रेती घाटांचा लिलाव झाला नाही त्यामुळे अवैध रेती तस्करांनी ट्रॅक्टरने अवैध रेती तस्करी करणे सुरु केले.
दिवस रात्र अवैध रेती तस्करी करून ठीक ठिकाणी रेतीचा अवैध साठा जमा करून ठेवला आहे हा रेती साठा ट्रॅक्टरने तस्करी करून विकला जातो. चिंचोली घाट लगेत नदीपात्रात वाळूसाठा गोळा करुन हायवा ट्रक मालकिला हजार रुपए ट्रैक्टर प्रती ब्रास, हायवा ट्रक मुल्य दरात अन्य ठिकाणी विकल्या जाते, ही कार्रवाई नावेपुर्ते आहे, मुख्य कारण मंडल अधिकारी व पटवारी यांच्या आशीर्वादाने सूरु असून मुक संमत्तीने मुकदर्शक बघ्याची भुमिका दिसून येते नागरिकामध्ये चर्चेला उद्यान, नकोडा गाववासिंयांना उन्हाळ्यात पाणी टंचाई भासत आहे. रेती घाटावर हजारों ब्रास वाळू उपसा केले असून शेतकऱ्यांना पाण्यासाठी उन्हाळ्यात दर-दर भटकावे लागते, वाळूमाफिया मुजोरीने धुमाकूळ रात्रदिवस वाळू उपसा केले जाते, गावकरिनागरिकांची व समाजिक कार्यकर्ता यांच्या मागणी करण्यात आले आहे,