
दैनिक चालु वार्ता
उदगीर प्रतिनिधी
उदगीर :- बिदर जिल्ह्यातील भालकी येथे गत अनेक वर्षांपासून स्मशान भूमीचा प्रश्न अति गंभीर स्वरूपाचा असून या स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ता नाही. आणि या स्मशानभूमी मध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचे माहेर घर झालेले आहे. याची दखल घेत या स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम संभाजी ब्रिगेडने हाती घेऊन स्मशान भूमी चकचकीत केली. याबद्दल संभाजी ब्रिगेड या संघटनेचे बिदर जिल्हा संयोजक सतीश कुमार सूर्यवंशी यांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
भालकीतल्या लिंगायत समाजाच्या स्मशान भूमीला भालकीच्या आमदारानं 60 लाख रुपये मंजूर केले.त्याबदल त्यांचे अभिनंदन.परंतु मराठा आणि हिंदुची स्मशान भूमी 40 वर्षांपासून दुर्लक्षित आहे.त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही म्हणून सतिशकुमार सुर्यवंशी यांनी खंत व्यक्त केली.संभाजी ब्रिगेड दहा वर्षांपासून स्वतः हातात कुदळ ,कुऱ्हाड आणि इतर साधनं हातात घेऊन स्मशान भूमीची साफसफाई करण्याचे काम करत आहे.मराठा समाजाचे भालकीत जवळपास 50 हजार मतदार आहेत.
पण समाजाचे नेते तडजोडीचे राजकारण करत असल्याने समाजाचे प्रश्न अधिकच गंभीर होत चालले आहेत.मतदान आमचं आणि राज्य दुसर्याचं हा विचार सर्वांच्या मनात घर करत आहे.म्हणून भालकीचे आमदार आणि बिदरचे खासदार यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाकडं लक्ष द्यावं अशा प्रकारचे आव्हान बिदर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संयोजक सतिश कुमार सूर्यवंशी यांनी केले.
याकामी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी हरिश तामग्याळे, दतू मोरे,पी.एस.बिरादार, सतिश वाडीकर, इंद्रजित हुंडेकर,भीम सुर्यवंशी ,बालाजी काटकर आणि असंख्य कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेत हजर होते.अशा सामाजिक उपक्रम आणि स्वच्छता अभियान मोहीम अनेकदा संभाजी ब्रिगेड कडुन राबवले जाते आणि त्यांचे भालकी व भालकी परिसरातून कौतुक केले जात आहे.
सतिशकुमार सुर्यवंशी